आज दिनांक 11 डिसेंबर २०२५ वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीची आमदार संतोष पाटील दानवे यांनी राज्यातील व मतदार संघातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रश्न उपस्थित केला आहे की सरकार नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी करते ,मात्र यात खरेदी मर्यादा वाढवावी त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी अडचणी निर्माण होणार नाही असा मुद्दा यावेळी त्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित केला आहे.