मोहाडी: कोदामेडी येथे मोटरसायकलने हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोदामेडी येथे दि. 18 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास आंधळगाव पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मोटरसायकलने हातभट्टीची दारू वाहतूक करणारा आरोपी अंकित सुभाष मसराम याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील रबरी ट्यूब मध्ये ठेवलेली 30 लिटर हातभट्टीची दारू व एक मोटरसायकल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.