दिग्रस: शहरातघाणीचे साम्राज्य, नियमित कचरा उचलत नसल्याने नागरिक हैराण: एड. विवेक बनगीनवार यांचा पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा
दिग्रस शहरात नियमित कचरा संकलन न झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रोज घराघरातून कचरा उचलण्याची जबाबदारी नगर परिषदेवर असताना अनेक भागात कचरा गाड्या पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुर्गंधी व रोगराईचा त्रास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एड. विवेक बनगीनवार यांनी बनगीनवार कोर्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगर परिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.