चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग ;कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने तनवीर अन्सार शेख वय वर्ष 21 याच्याविरोधात तक्रार दिली आहे. सदर महिलेच्या घराच्या गेट जवळ तिच्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीचा हात धरून तनवीर यांनी वाईट हेतूने स्पर्श केला .कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या आधी सुद्धा तनवीर याने त्रास दिला. तो म्हणायचा तुमच्या कडून जे होते ते करून घ्या .कुणाला सांगितल्यास तुमच्या मुलीला जीवाने मारून टाकीन अशी धमकी देत होता व फोनवर आज तुमच्या मुलीला घेऊन जातो असे म्हटले.