वणी: वेकोली मध्ये कार्यरत महिला कर्मचारीचा आपहरणाचा प्रयत्न शहरांतील भालर रोडवरील घटना आरोपी अटक
Wani, Yavatmal | Oct 15, 2025 वणीतील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर वारंवार लैंगिक छळ, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच चाकूच्या धाकावर बळजबरीने कारमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न केल्याची तक्रारीवरुन WCL चेच एक वरिष्ठ कर्मचारी तसेच तथाकथित युनियन लीडरवर वणी पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हा दाखल केले आहे. या प्रकरणामुळे कोल माइन्स क्षेत्र आणि वणी शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.