खामगाव: हिंगणा कारेगांव येथून २६ वर्षीय विवाहिता दीड वर्षीय मुलीसह बेपत्ता
खामगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
हिंगणा कारेगांव येथून २६ वर्षीय विवाहिता दीड वर्षीय मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.हिंगणा कारेगांव येथील सौ पल्लवी अविनाश इंगळे वय २६ वर्ष हि विवाहित तिच्या दीड वर्षीय प्रणवी हिला सोबत घेऊन घरून निघून गेली ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.