पालघर: पालघर शहरात नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आला प्लास्टिक निर्मूलन जनजागृती उपक्रम; 15 किलो प्लास्टिक जप्त
पालघर नगरपरिषदेच्या वतीने पालघर शहर व नगरपरिषद हद्दीत प्लास्टिक निर्मूलन जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेंतर्गत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान 15 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.