जळगाव: अमळनेर नगरपरिषदेचा शिपाई लाच प्रकरणात गोवला, 2 हजारांची मागितली लाच, अमळनेर पोलिसात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
अमळनेर नगरपरिषदेच्या कार्यालयात 'आध्यासित प्रगती योजना व वेतन निश्चिती'च्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिपाई कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता कारवाई केली.