देऊळगाव राजा: ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ
*घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ* देऊळगाव राजा ( दि २२ सप्टेंबर ६ वा घटस्थापना प्रतितिरूपती अर्थात विदर्भाचे तिरुपती बालाजी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या शहरातील श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये आश्विन शु. १ सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना करून श्री बालाजी महाराजांच्या आश्विन यात्रा उत्सवास सुरुवात झाली. श्री बालाजी महाराजांच्या मंदिरावर दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजन करून नवीन पताका फडकविण्यात आली. ४०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा