अचलपूर: आठवडी बाजार परिसरात जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले
शहरातील नृसिंह मंदिरासमोर आठवडी बाजार परिसरात जलवाहिनी फुटल्याने सोमवार सकाळपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. जलवाहिनीतील मोठ्या गळतीमुळे रस्त्यावर चिखल व पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना तसेच वाहतूकदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मौल्यवान पिण्याचे पाणी वाया जात असताना प्रशासन मात्र अद्याप दखल घेत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीन