नागपूर शहर: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
30 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा वर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव पवन ठाकूर असे सांगण्यात आले असून आरोपीकडून 400 रुपये किमतीचे शस्त्र जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे