श्रीवर्धन: भाजपा सचिव महाराष्ट्र प्रदेश रवि मुंडे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तळा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रविभाऊ मुंडे यांनी माजी नगराध्यक्षांसह व असंख्य कार्यकर्त्यांसह आज गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यावेळी रायगड जिल्ह्यातील तसेच तळा शहर आणि तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.