जालना: बोगस पावत्यांद्वारे शेतकर्यांची लूट? मंठ्यातील कृषी सेवा केंद्राविरोधात गंभीर आरोप; कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Jun 16, 2026 मंठा शहरातील काही कृषी सेवा केंद्रांमधून शेतकर्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, कृषी साहित्य खरेदीच्या व्यवहारांमध्ये बोगस पावत्यांचा वापर करून जादा पैसे उकळले जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सी या कृषी सेवा केंद्राविरोधात एका शेतकर्याने थेट आरोप करत संबंधित प्रकाराचा व्हिडिओ समोर आणल्याने खळबळ उडाली आहे.