चंद्रपूर: माजी केंद्रीय पूर्व राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत वणी येथील शेतकरी मंदिर येथे ग्रामीण भाजपाची बैठक
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप वणी ग्रामीण (पश्चिम) च्या वतीने दि. १९ ऑक्टोला १२ वणी येथील शेतकरी मंदिर येथे आयोजित संघटनात्मक बैठकीस माजी केंद्रीय पूर्व राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता प्रस्थापित करण्याकरिता सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे व अन्य उपस्थित होते.