अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केडगाव पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. केडगावकरांना तब्बल पाच तास पाणी म्हणजेच यापूर्वी ७० ते ८० लाख लीटर पाणी पुरवठा होत होता. आता तो पाणीपुरवठा १२ लाख लीटर पाणी वाढवून मिळणार असल्याचे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली. त्यामुळे उद्या महापालिकेत होणारे माठ फोडो आंदोलन हे स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.