जालना: जालना शहरात अनधिकृत झेंडे-बॅनर प्रकरण; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलीसांकडून तपास सुरु
Jalna, Jalna | Apr 10, 2026 जालना शहरातील आस्था हॉस्पिटल चौक व रिलायन्स मार्ट चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे झेंडे व बॅनर लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणी कारवाई सुरू केली असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. याबाबत शामसन छबुराव कसबे, सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख तथा बांधकाम निरीक्षक,महानगरपालिका जालना यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.