अकोला: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात गांधी रोड येथे काळी दिवाळी केली साजरी
Akola, Akola | Oct 21, 2025 अकोला शहरातील गांधी रोड येथे आज दिवाळीच्या दिवशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या हमीभाव विरोधात निषेध आंदोलन करण्यात आल. या आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केलं.क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गांधी रोड अकोला येथे सोयाबीन, मुग, उडीद विक्री करून सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी सरकार -: शेतमालाला हमीभाव जाहीर करणार पण खरेदी नाही करणार व्यापारी -: आम्ही शेतमाल खरेदी करणार पण हमीभाव नाही देणार असं सध्या सुरू आहे.