अमित ठाकरेवरील गुन्हा अनावश्यक; शिवप्रेमी भावना महत्त्वाची आमदार अमोल मिटकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शवला आहे. पुतळ्यावर धूळ असल्याने अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेली भावना ही शिवप्रेमातून आलेली असून, त्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती, असे मत मिटकरी यांनी मांडले. शिवप्रेमीची भावना समजून घेत सर्वांनी वागले पाहिजे.