जालना: स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ
माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी केली प
Jalna, Jalna | May 2, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील शकुंतला नगर परिसरातून स्वच्छता व आरोग्य सभापती कपिल भुरेवाल यांच्या पुढाकारातून विशेष स्वच्छता मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. “माझा प्रभाग स्वच्छ, माझे शहर स्वच्छ” हा संकल्प डोळ्यासमोर ठेवत कपिल भुरेवाल यांनी स्वतःच्या प्रभागापासून सुरू केलेली ही मोहीम आता संपूर्ण जालना शहरात राबविण्यात येणार असून दर आठ दिवसांनी नियमितपणे ही मोहीम आयोजित केली जाणार आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्येक शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा