गेवराई: आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली
Georai, Beed | Nov 8, 2025 आज अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रस्थानी असलेल्या लढवय्या नेते मनोज जरांगे पाटील यांची आमदार क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेतली. अलीकडेच त्यांच्या हत्येचा अयशस्वी कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. या कटाची संपूर्ण तपासणी करून सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.