जालना: जामवाडी शिवारातील उसाच्या शेताला भीषण आग; दोन एकर ऊस जळून खाक; शेतकर्याचे लाखोंचे नुकसान
Jalna, Jalna | May 7, 2026 जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात उसाच्या शेताला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत सुमारे दोन एकरांतील ऊस जळून खाक झाला आहे. गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता मिळालेल्या माहतीनुसार तीव्र उन्हाळा आणि उष्ण वातावरणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना-देऊळगावराजा रोडवरील जामवाडी शिवारात माऊली हॉटेल रेस्टॉरंटच्या पाठीमागील घडली.