आज देशात सर्वत्र भाऊबीज साजरी होत आहे. त्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातही भाऊबीजेचा सण साजरा होतोय. आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील निवासस्थानी मिटकरी आणि त्यांच्या बहिणींनी भाऊबीज साजरी केली. दरम्यान मिटकरी यांना ओवाळल्यानंतर मीडियाशी बोलताना मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावर भाऊबीजेच्या निमित्ताने राजकीय भाष्य केलं.