पारोळा: जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे, खेडीढोक येथील ग्रामस्थांचे उपोषण माघे.
तालुक्यातील खेडीढोक, येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत खेडीढोक भागातील जलवाहिनीच्या कामकाजामध्ये निकृष्ट दर्जाचे कार्य करण्यात आले आहे, असा आरोप करत गावकऱ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.