खंडाळा: खंडाळा ता.बाळूपाटलाचीवाडीत मातंग समाजाच्या कुटुंबियांना ग्रामदेवतेची पालखी उचलण्यास मज्जाव केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
खंडाळा तालुक्यातील बाळू पाटलाचीवाडी या गावातील, मातंग समाजाच्या कुटुंबीयांना ग्रामदेवतेची पालखी उचलण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तींवर, अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करून, जातीवादी करणाऱ्या लोकांकडून मातंग समाजाच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली असून या संदर्भात लोणंद पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली असल्याची माहिती, डेमोक्रॅट्रिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिली.