चिखलदरा: पंचायत समिती चिखलदरा येथे राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात संपन्न
चिखलदरा येथे राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात संपन्न चिखलदरा तालुका आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या वतीने आठवा राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पोषणदिंडी काढण्यात आली तसेच किशोरी मुलींना संतुलित आहार, आरोग्य मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी 100 किशोरी मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.पोषण माहनिमित्त बालविवाह निर्मूलनावरील व्याख्यान, जनजागृती मोहीम आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.