औसा: औसा पॅटर्नचा नवा अध्याय,मनुष्यहानी,पशुधनहानी व गृहहानीग्रस्त ११२५ कुटुंबांना आ.अभिमन्यू पवाराकडून 90 लाखाची मदत
Ausa, Latur | Oct 6, 2025 औसा -ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यावर कोसळलेल्या अतिवृष्टीने औसा मतदारसंघातील जनजीवन विस्कळीत झाले. पिकांचे मोठे नुकसान, घरात पाणी शिरून घरसामानाचे व घरांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि काही ठिकाणी झालेली जीवितहानी यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले. या संकटात औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी “विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा” या भावनेतून सुमारे ९० लाख रुपयांची थेट मदत जाहीर करत माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.