सेनगाव: सुकळी साठवण तलावासाठी 124 कोटी 36 लाख खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मान्यता,आमदार मुटकुळे यांच्या प्रयत्नाला यश
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नाला यश आले असून सेनगांव तालुक्यातील सुकळी येथील साठवण तलावासाठी आज शासनाने 124 कोटी 36 लाख खर्चाच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे सदर साठवण तलावाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे सादर केला होता या तलावामुळे 677 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या विकास कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.