जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ 'ब' च्या निवडणूक निकालाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांचा अवघ्या १४७ मतांनी निसटता पराभव झाला असून, प्रतीक्षा सोनवणे या विजयी झाल्या आहेत. मात्र, या निकालात आ. मंगेश चव्हाण यांनी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला असून, पराभूत होऊनही त्यांनी काढलेल्या आभार रॅलीने शनिवारी 17 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता सर्वांचे लक्ष वेधले.