परभणी: बंटी और बबली चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश स्था.गु.शा.ची कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती
परभणी स्थानिक गुन्हे शाखेने "बंटी और बबली" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीत ६० वर्षीय नामदेव बाबासाहेब वक्ते रा. पडेगाव छत्रपती संभाजी नगर व ४५ वर्षीय एक महिला रा. गुलाब वाडी टाऊन छत्रपती संभाजी नगर यांचा समावेश असून, आरोपींनी पाथरी पोलीस ठाणे हद्दीत दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच शेख महेमूद याच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता देण्यात आली.