जालना: जालना तालुक्यात पोलिसांची कारवाई; धारदार रामपुरी खंजीरसह युवक अटकेत
Jalna, Jalna | Apr 6, 2026 जालना तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका युवकाला धारदार रामपुरी खंजीरसह पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार वार दि. 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी गजानन कोंडीबा जगताप हे सहकार्यांसह 5 एप्रिल रोजी सायंकाळी जिंदल ऑर्कीड मानस हॉस्पिटलच्या मागील परिसरात एका अर्जाची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी डॉ. शेळके यांच्या घराच्या बांधकामाजवळ चार युवक संशयास्पदरीत्या फिरताना दिसले.