घरभरणीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला बसने धडक दिली. यात महिला चाकाखाली बसच्या आल्याने चिरडून ठार झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलचे नाव आरती संदीप पाटील (३२, रा. आमोदा, ता यावल) असे आहे. याप्रकरणी बसचालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.