पनवेल: माजी नगरसेवक हरेश केणी यांचा भाजपला राम राम
मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयात समर्थकांसहित केला पक्षप्रवेश
Panvel, Raigad | Sep 19, 2025 पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शुक्रवारी ( ता. 19) मुबंई येथिल टिळक भवन या राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत केणी यांनी समर्थकांसहित कॉग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पनवेल पालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार आहे.