नेवासा तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा विद्यालयात एसएससी २००२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.