जालना: पिंपरखेड येथे धारदार तलवार बाळगणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; धारदार तलवारीसह एकजण ताब्यात
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना जिल्ह्यातील पिंपरखेड येथे धारदार तलवार बेकायदेशीररीत्या बाळगणार्या एका इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार दि. 2 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धारदार शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.