पालघर: उमरोळी येथे मंदिरात अपकृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
उमरोळी येथील शिव मंदिरात एका आरोपीने अपकृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी सागर पाटील याला अटक केली. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे शिवभक्त असूनही देव मदत करत नाही या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.