उमरगा: बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी मुरूम मधील नाईकनगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी सुसाईड नोट लिहून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता घडली आहे.पवन गोपीचंद चव्हाण असं तरुणाचं नाव असुन आरक्षणासाठी पवनने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा आहे.उमरगा तालुक्यातील मुरूममधील नाईकनगर येथील तरुण,जालना येथील आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर तरुणावे दुर्दैवी पाऊल उचलले आहे.मयत तरुणाच्या पाश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे.