चंद्रपूर: जिल्हा क्रीडा संकूल येथील विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत 256 खेळाडूंचा सहभाग
नागपूर विभागीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आयोजन आज दि 31 ऑक्टोबर 12 वाजता पासून चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलित बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले. यात नागपूर विभागातील नागपूर ग्रामीण, नागपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर ग्रामीण, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातून 128 मुले व 128 मुली असे एकूण 256 खेळाडू मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.