माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना आज दि ९ डिसेंबर रोजी दु ४ वाजता विधीमंडळात माध्यमांसमोर बोलण्यापासून रोखल्याची माहिती समोर आली आहे. जाधव हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार बँक करप्ट असल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर करणार होते, असा दावा करण्यात आला. अचानक मिळालेल्या निर्बंधांमुळे माध्यमांशी संवाद बंद करण्यात आला असून यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे. जाधव यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला.