मानगाव: कोणीही कितीही एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम नाही उलट ठाकरे बंधू एकीने काँग्रेस बाहेर पडेल
चंद्रकांत पाटील यांचे भाकित
Mangaon, Raigad | Sep 22, 2025 ठाकरे बंधूंच्या फिफ्टी-फिफ्टी युतीवर बोलताना चंद्रकांत दादांनी महायुती मजबूत असल्याचा दावा केला. कोणीही कितीही एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही, उलट ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस बाहेर पडेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. आमच्या सरकारने मुंबईसह राज्यात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून त्यामुळे जनता महायुतीबरोबर आहे, असेही चंद्रकांत दादा म्हणाले.