Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्यावर अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Jalna, Jalna | Apr 4, 2026
बदनापूर तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात एका अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवार दि. 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार,देवगाव फाट्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.