शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२५-२६ करिता भंडारा जिल्ह्यात २२७ संस्थांच्या एकूण २३७ धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे. प्र. जिल्हा पणन अधिकारी, भंडारा, संभाजी बी. चंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व धान खरेदी केंद्रांनी त्यांच्याकडील आरंभीच्या शिल्लक बारदान्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर करणे अनिवार्य आहे आणि त्या प्रमाणातच धान खरेदी करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रे यांनी दिना