* वर्णन: सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया' मोहीम हाती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.