अंबरनाथ येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक उद्या 20 डिसेंबर रोजी होत आहे. मात्र अंबरनाथ मधून निवडणुकीपूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबरनाथ मध्ये निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीन उघडल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. प्रशासनाने प्रकरणाची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व उद्याची निवडणूक सुरळीत पार पाडावी अशी मागणी केली आहे