रोहा: रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचा जनता संवाद
Roha, Raigad | Nov 2, 2025 आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आयोजित ‘जनता संवाद’ कार्यक्रमात पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगडसह राज्यातील विविध भागातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी नागरिकांनी मांडलेल्या समस्या, अडचणी आणि मागण्यांची सविस्तर माहिती घेऊन त्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी तटकरे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची धोरणात्मक दिशा आणि कार्ययोजना याबाबत मार्गदर्शन केले.