परिमंडळ क्रमांक चारच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी 18 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस स्टेशन येथे आज जप्त मुद्देमाल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी दिवाळीच्या आधी मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागपूरकरांनी पोलिसांचे आभार मानले आहे.