पातूर शहरातील संभाजी चौक ते टी.के.व्ही. बायपास मार्गालगत असलेले नगर परिषदेच्या ताब्यातील क्रीडांगण सध्या सांडपाणी व घाणीमुळे खेळासाठी अयोग्य बनले आहे. आजूबाजूच्या रहिवाशांकडून घरगुती नाल्याचे पाणी थेट मैदानात सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरली असून युवक व खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत निर्भय पोहरे व समस्त खेळाडूंनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने साफसफाई, सांडपाणी थांबवणे अशी मागणी नगरपरिषद कडे केली.