रोहा: जरा अपने गिरेबान मे झाक के देखो
अनिकेत तटकरेंनी मंत्री गोगावलेंना सुनावले
Roha, Raigad | Sep 14, 2025 रोहा येथील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात डावलल्याने मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. गोगावले यांच्या या भुमिकेचा आता राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पहले आप अपने गिरेबान मे झांक कर देखे असा टोला मंत्री गोगावले यांना लगावलाय. हक्कभंग आणायचाच असेल तर आधी अलिबाग नगरपालिकेवर आणा असा सल्ला देताना सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनीच मंत्री गोगावले यांना डावललय.