बदनापूर: दाभाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीत आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयावर जाहीर प्रवेश
आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बदनापूर येथे भाजपा संपर्क कार्यालयावर भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे, यामध्ये जयसिंग खोकड, प्रतापसिंह कवाली ,गोकुळ सिंग महेर ,गफार लोकरे ,कल्याण खोकड ,बाळू खोकड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला असून या सर्वांची आमदार नारायण कुचे यांनी पक्षांमध्ये स्वागत केले आहे.