लातूर : वेळ अमावस्या म्हणजे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक घरात धमाल उडते! लहानमोठे सर्वजण शेतात जाऊन पांडवाची पूजा करतात, आंबील उंडे खाऊन तुला होतात. या पवित्र परंपरेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी २०२५ साठीच्या तिसऱ्या स्थानिक सुट्टीची घोषणा केली आहे.१९ डिसेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त औसा तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात सुट्टी जाहीर!केली असल्याची जिल्हा प्रशासनाने सायंकाळी साडेपाच वाजता ही माहिती दिली.