स्वर्गीय नानाशेठ घरत आणि स्वर्गीय सोनुबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ पाचवीचा पाडा येथे 'स्मृती चषक-2025' मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केलेतसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले. या स्पर्धेचे आयोजन 10 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत पापडीचा पाडा येथील आर.ए.एफ. कॅम्प मैदानात करण्यात आले आहे.